अस्वीकरण

या पोर्टलवरील माहिती आणि सामग्री काळजीपूर्वक व काटेकोरपणे प्रसिद्ध करण्यात आलेली असली तरीही, ही माहिती कशी वापरली जाते किंवा तिच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या परिणामांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जबाबदार राहणार नाही. कोणतीही विसंगती/गोंधळ असल्यास, अधिक स्पष्टतेसाठी वापरकर्त्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

संकेतस्थळ धोरणे

अटी व शर्ती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या संकेतस्थळावरील मजकुराचे व्यवस्थापन करीत आहे. या संकेतस्थळावरील मजकुराची अचूकता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तथापि, या संकेतस्थळावरील मजकूर हा कायद्याचे विधान म्हणून अथवा कोणत्याही कायदेशीर उद्देशासाठी वापरण्याचा हेतू नसून त्याप्रमाणे त्याचा उपयोग करू नये.

या पोर्टलचा वापर अथवा या पोर्टलवरील माहितीचा वापर न झाल्यामुळे किंवा त्यापासून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या खर्च, नुकसान किंवा हानीबाबत अप्रत्यक्ष किंवा परिणामस्वरूपी नुकसान अथवा हानीसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.

या पोर्टलवर केवळ सार्वजनिक सोयीसाठी इतर संकेतस्थळांचे दुवे प्रदान करण्यात आलेले आहेत. तथापि, अशा संकेतस्थळांवरील पृष्ठे सदैव उपलब्ध राहतील याची हमी महामंडळ देऊ शकत नाही.

या अटी व शर्ती भारतीय कायद्यांनुसार नियंत्रित व त्यानुसारच समजून घेतल्या जातील. या अटी व शर्तींमधून उद्भवणारे कोणतेही वाद हे भारतातील न्यायालयांच्या विशेष अधिकारक्षेत्रास अधीन राहतील.

कॉपीराइट धोरण

या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेला मजकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पूर्वपरवानगी ई-मेलद्वारे प्राप्त करून, विनामूल्य पुनरुत्पादित करता येईल. तथापि, पुनरुत्पादित करण्यात आलेला मजकूर हा अचूक असावा तसेच त्याचा अवमानकारक अथवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भात कोणत्याही प्रकारे वापर केला जाऊ नये.सदर मजकूर प्रकाशित किंवा इतरांना वितरित करताना त्याचा मूळ स्रोत स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य राहील.

तथापि, या संकेतस्थळावरील ज्या मजकुरावर तृतीय पक्षाचा कॉपीराइट लागू आहे, त्या मजकुराच्या पुनरुत्पादनास या धोरणाचा अवलंब करता येणार नाही. अशा प्रकारच्या मजकुरासाठी संबंधित विभाग किंवा मूळ कॉपीराइट धारक यांच्याकडून स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक राहील.

गोपनीयता धोरण

या संकेतस्थळावरून आपली कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती (उदा. नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता) स्वयंचलितपणे संकलित केली जात नाही, जी आपली वैयक्तिक ओळख पटवू शकेल. जर या संकेतस्थळावर आपणास वैयक्तिक माहिती प्रदान करण्याची विनंती केली गेली, तर ती माहिती कोणत्या विशिष्ट उद्देशासाठी गोळा केली जात आहे याबाबत आपणास पूर्वसूचना दिली जाईल (उदा. अभिप्राय फॉर्म). तसेच, आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना केल्या जातील.

या संकेतस्थळावर आपण स्वयंप्रेरणेने दिलेली वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती कोणत्याही तृतीय पक्षास (सार्वजनिक/खाजगी) विकली अथवा सामायिक केली जाणार नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती ही गमावणे, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा उघड करणे, बदल करणे किंवा नष्ट होणे यापासून संरक्षित केली जाईल.

या संकेतस्थळावर भेट देणाऱ्या वापरकर्त्यांविषयी काही माहिती संकलित केली जाते, जसे की इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्ता, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टीम, भेटीची तारीख व वेळ तसेच पाहिलेली पाने. तथापि, संकेतस्थळास हानी पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वगळता, या माहितीचा व्यक्तींच्या ओळखीशी संबंध लावण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही.

हायपरलिंकिंग धोरण

बाह्य संकेतस्थळे/पोर्टल्स यांवरील दुवे

या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपणास इतर संकेतस्थळे/पोर्टल्स यांचे दुवे आढळतील. हे दुवे केवळ आपल्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तथापि, हे दुवे सर्व वेळ कार्यरत राहतील याची हमी देता येणार नाही आणि संबंधित पृष्ठे उपलब्ध राहतील यावर आमचा कोणताही नियंत्रण नाही.