देशाच्या अर्थव्यवस्थेत, औद्योगिक प्रगतीत, निर्यातीमध्ये आणि थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात आमचा सर्वात मोलाचा वाटा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये मऔवि महामंडळाने महत्वाची भूमिका बजावली आहे. मऔवि महामंडळाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्तम औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत महाराष्ट्राचे आघाडीचे स्थान कायम ठेवण्यासाठी आणि राज्याचा सर्वंकष आर्थिक विकास साध्य करण्याकरिता सुयोग्य धोरणे आखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील गुंतवणूक वाढीच्या योजनांमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे आणि भारतातील पहिली एक लक्ष कोटी रुपयांची (ट्रिलीयन डॉलर्स) महाअर्थव्यवस्था होण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्याला प्राप्त करून देणे ही आमच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अभियानाची उद्दिष्टे आहेत.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीला आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या उद्दीष्टाच्या जोडीने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे व पर्यावरणाचे जतन व संवर्धन हेदेखील आम्ही आमचे कर्तव्य मानतो. आगामी काळात शाश्वत विकास साधणे हे राष्ट्रासाठी आणि जगासाठी अनिवार्य असणार आहे.
मऔवि महामंडळाने महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदारांचे नेहमीच सन्मानपूर्वक स्वागत केले आणि उद्योगांकडून मिळालेल्या अभिप्रायांनुसार वेळोवेळी आमच्या सेवेत सुधारणा घडवून आणल्या आणि पुढेही हे करत राहू. आमच्या उद्योगांच्या संपूर्ण गुंतवणूक चक्रात त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यव्यवहारांमध्ये येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. औद्योगिकदृष्ट्या पोषक वातावरण निर्मिती व पायाभूत सुविधांचा विकास हे आमचे लक्ष्य आहे.
उद्योगांना पोषक वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मी महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला गुंतवणूकीसाठी आमंत्रित करतो.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून १९६२ मध्ये महामंडळाची स्थापना.
नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती
औद्योगिक क्षेत्रांच्या विकासात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणे
"उद्यमात सकल समृद्धी" हे मऔवि महामंडळ चे ब्रिद वाक्य आहे "
सुमारे " १०११७१.४१ हेक्टर क्षेत्रामध्ये ३०० औद्योगिक वसाहतींची स्थापना केली आहे.
आयटी, बीटी, विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ), वाइन (ग्रेप प्रोसेसिंग) पार्क, सिल्व्हर झोन, रत्ने यासह विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी विशेष उद्याने विकसित केली आहे
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून १९६२ मध्ये महामंडळाची स्थापना.
मुंबई-ठाणे-रायगड | १५,००० एकर अभियांत्रिकी | अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहनघटक | रसायने | औषधी |
"पुणे-चाकण-तळेगाव-सातारा | ८,००० एकर डेटा सेंटर | रत्ने आणि दागिने | अभियांत्रिकी | अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहन घटक | ईएसडीएम | लॉजिस्टीक
नाशिक-मालेगाव-अहमदनगर | ५,००० एकर अन्न प्रक्रिया | वैद्यकीय उपकरणे | ईएसडीएम | अभियांत्रिकी
औरंगाबाद (AURIC, DMIC) -जालना | ८,००० एकर अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहन घटक | ईएसडीएम | कापड
नागपूर - अमरावती | ४,००० एकर अंतराळ आणि संरक्षण | अभियांत्रिकी | कापड | अन्न प्रक्रिया
मऔवि महामंडळची देशातील सर्वात मोठी औद्योगिक लॅंड बँक असून २.५ लाख एकरांपेक्षा जास्त जमीन आहे आणि पुढील ५ वर्षात आणखी ४०,००० हेक्टर क्षेत्र जोडण्याची योजना आहे.
मऔवि महामंडळने पुढील ५ वर्षांत भूसंपादनाची योजना आखली| Year | Number of locations to be acquired | Key locations | Proposed area for acquisitions |
|---|---|---|---|
| २०२०-२१ | २० | खर्डी, रांजणगाव, सिन्नर, लासूर | ५०३० |
| २०२१-२२ | ३ | डीएमआयसी दिघी (औरंगाबाद) | ५२०४ |
| २०२२-२३ | १५ | खालापूर, तळोजा, बारसाव, चाकण काटोल, कारंजा (नागपूर) | ५१०१ |
| २०२३-२४ | ३ | दापचरी, तळेगाव टप्पा क्र. ४, बिडकीन | ५१०१ |
| २०२४-२५ | ६ | रांजणगाव, बिडकीन टप्पा क्र. 2, हंगासुपा (अहमदनगर), जामनेर | ३५९४ |
महत्वाचे भूसंपादन५०० एकरच्या चाकण टप्पा क्र. ५ मध्ये भूसंपादनाचे नियोजन आहे. जयपूरमध्ये देखील भूसंपादन नियोजित
तळोजा - ५०० एकर खालापूर - ५०० एकर तळेगाव - २५० एकर
एशिया पल्प अँड पेपर (एपीपी) सारख्या मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी - जगातील लगदा, कागद आणि बांधणीत सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक
रांजणगाव टप्पा क्र. ३ दापचेरी खर्डी टप्पा क्र.१ आणि २ खालापूर मालेगाव नाशिक (अजुंग) तळेगाव टप्पा क्र.४ चाकण टप्पा क्र. ५ अतिरिक्त सुपा
| पद | नाव | संपर्क क्रमांक | ईमेल |
|---|---|---|---|
| अध्यक्ष | मा.ना. श्री. उदय सामंतमंत्री (उद्योग) |
दूरध्वनी क्र.: २२८४३६६४ | min.industry@maharashtra.gov.in |
| उपाध्यक्ष | मा.ना. श्री. इंद्रनील नाईकराज्यमंत्री (उद्योग) |
||
| सदस्य सचिव | मा. श्री. पी. वेलरासूमुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम |
दूरध्वननी क्र. ४०१६०८०० ४७४८९२३७ (अंधेरी) दूरध्वननी क्र.: ४०१६१४५१, ४०१६१४५४ (WTC) |
ceo@midcindia.org |
| सदस्य | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. (महावितरण) | दूरध्वनी क्र.: २६४७४६४४ | psec.energy@maharashtra.gov.in |
| सदस्य | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य उद्योग आणि गुंतवणुक महामंडळ (सिकॉम) | दूरध्वनी क्र.: २२६९१८७७/२२६९१८७४ | mdspa@sicomindia.com |
| सदस्य | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ | दूरध्वनी क्र.: ६६५७२७९० | msfchead@tnl.net.in |
| सदस्य | उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) | दूरध्वनी क्र.: ६६४०५४०१ | pa2vpmhada@gmail.com |
| विशेष आमंत्रित | प्रधान सचिव, उद्योग | दूरध्वनी क्र.: २२०२५३९३/२२०२७२८१ | psec.industry@maharashtra.gov.in |
| विशेष आमंत्रित | विकास आयुक्त, उद्योग | दूरध्वननी क्र.: २२०२३५८४/२२०२८६१६ | didci@maharashtra.gov.in |