मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. वेतन प्रक्रिया आणि निधी व्यवस्थापन
२. प्राप्त (रिसिव्हेबल्स)
३. देय (पेएबल्स)
४. अन्य खर्चांसाठी पैसे देणे
५. वेतन (पेरोल)
६. भविष्यनिर्वाह निधी

हा विभाग औद्योगिक क्षेत्रांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदार आहे. विभागीय कार्यालय (डीओ) आणि उप-विभागीय कार्यालयांद्वारे सेवा पुरवली जाते.
मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
५. औद्योगिक क्षेत्रांना जलस्त्रोतांमधून होणाऱ्या पाणी पुरवठाचे नियोजन, अंमलबजावणी व व्यवस्थापन करणे.
६. जलशुद्धीकरण केंद्रांची (डब्ल्यूटीपी) उभारणी करणे.
७. औद्योगिक क्षेत्रामध्ये शुद्ध मुख्य जलवाहिनी (प्युअर वॉटर रायझिंग मेन्स) आणि पाणी पुरवठयाचे नियोजन व उभारणी करणे.
८. जमिनीवरील जलाशय / (ग्राउंड सर्व्हिस रिझर्वेयर) (जीएसआर), उन्नत जलाशय /(एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वेयर) (ईएसआर) यांचे नियोजन व उभारणी करणे.
९. मंजुरी मिळालेल्या विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे जाळे उभारणे.
१०. क्रॉस ड्रेनेज वर्क्स (सीडी) आणि पूल बांधणे.
११. पथदिवे आणि मलनिस्सारण व सांडपाणी केंद्रांचे नियोजन व उभारणी करणे.
१२. बँक, टपाल कार्यालय, टेलिकॉम सुविधा, पोलीस स्टेशन, अग्निशमन स्टेशन, कॅन्टीन इत्यादींसाठी सामाईक सुविधा केंद्र (सीएफसी) उभारणे.
१३. रासायनिक क्षेत्रांमधील सांडपाणी एकत्र करण्याची व त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारणे.
१४. विविध शासकीय विभाग व संस्थांसाठी डिपॉझिट काँट्रीब्युशन वर्क्स हाती घेणे.
१५. प्रादेशिक कार्यालयांना प्रत्यक्ष ठिकाणी पुढील सेवांसाठी सहाय्य करणे.
ए. भूसंपादन
बी. नवीन विकास नियोजन
सी. विद्यमान विकास आराखड्यात बदल/ सुधारणा
डी. भूखंड वाटप व भूखंड व्यवस्थापनासाठी भूखंड व पायाभूत सुविधांची देखभाल करणे

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. पर्यावरण रक्षण, सीईटीपी, सीएचडब्ल्यूटीएसडीएफ, एसटीपी, नवीन मऔविमसाठी पर्यावरण मंजुरी, प्रक्रिया केलेल्या औद्योगिक सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी पाईपलाईनकरिता सीआरझेड मंजुरी, घनकचरा विल्हेवाटीची सक्तीने अंमलबजावणी करणारे पर्यावरण कायदे याविषयीच्या मार्गदर्शक सूचना देणे, मऔविम औद्योगिक क्षेत्रांमध्ये पर्यावरणाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी देखरेख ठेवणे.
२. नगर रचना व नवीन धोरणांचे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सल्ले देणे, प्रदूषणाच्या तक्रारी व घटना हाताळणे, जागरूकता निर्माण करणे व सहाय्य करणे
३. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून प्राधान्य भूखंड अर्जांची छाननी करणे

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. मऔविम क्षेत्रांमध्ये अग्निशमन केंद्र चालवणे व त्यांची देखभाल करणे
२. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ व मऔविमच्या विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी करणे. तसेच इमारत आराखडा मंजुरीकरते वेळी अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा समावेश आहे.
३. इमारतीला भोगवटा देण्यापूर्वी अंतिम अग्निशमन मंजुरी देणे.
४. विविध अधिनियम व नियमांमधील तरतुदींच्या आधारे अग्निशमन मंजुरीचे नूतनीकरण करणे.

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. भरती प्रक्रिया
२. मनुष्यबळ विकास व्यवस्थापन
३. वाहनांचे व्यवस्थापन
४. रजेचे व्यवस्थापन
५. ‍किरकोळ खरेदी
६. प्रतिपूर्ती
७. भरपाई व लाभांचे नियोजन इ.

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत घटकांची संरचना, विकास, अंमलबजावणी, देखभाल व सहाय्य करणे.
२. हार्डवेअर व सॉफ्टवेअर परवाना (लायसन्स) खरेदी करणे.
३. डेटा सेंटर्सची देखभाल करणे.
४. अॅटप्लिकेशन्स, हार्डवेअरचे पायाभूत घटक, कनेक्टीव्हिटी, होस्टिंग, नेटवर्क आणि सुरक्षितता यांचे व्यवस्थापन व देखभाल करणे.

मऔवि महामंडळाच्या भूमी विभागांमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा ४ क्षेत्रांमध्ये असणाऱ्या १६ प्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे.
मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. भूखंड वाटप
२. भूखंड व्यवस्थापन (यामध्ये उप-विभाजन, एकत्रीकरण, हस्तांतरण, पोट-भाडे, भूखंडांची पोट-भाडेपट्टी इत्यादींचा समावेश होतो)
३. भाडेकरार
४. तारण

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. जमिनीचे तपशील निश्चित करणे
२. जमिनीचे पुर्नग्रहण करण्यासाठी नोटीस जारी करणे
३. भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करणे
४. भूसंपादन अधिकाऱ्याचे निरीक्षण
५. नोंदणीकृत जमीन मालकांना अधिसूचना देणे
६. सार्वजनिक हरकत यंत्रणा (ऑफलाईन व ऑनलाईन)
७. संयुक्तपणे सर्वेक्षण करणे
८. संयुक्त मोजमाप अहवाल तयार करणे
९. कलम १६(१) अन्वये जमिनीचा ताबा घेणे
१०. राजपत्रात जमीन अधिग्रहणाची अधिसूचना देणे (प्रकरण ६)
११. मोबदल्यावरील हरकत
१२. हरकतीअंतर्गत चौकशीसाठी तरतूद

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. मऔवि महामंडळाशी संबंधित कायदेशीर व न्यायालयीन बाबी.
२. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या सभा आयोजित करणे, कार्यसूची आणि कायदेशीर बाबींशी संबंधित सभेचे इतिवृत्त जारी करणे.
३. वकिलांची नियुक्ती.
४. मऔवि महामंडळासाठी करार, सामंजस्य करारांचा मसुदा तयार करणे.
५. भूखंड वाटप, भाडे इत्यादींशी संबंधित करारांचे मसुदे तयार करणे

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. विपणन उपक्रमांसाठी मोहिमांचे व्यवस्थापन करणे.
२. सोशल मिडियावर लक्ष ठेवणे व त्यांचे व्यवस्थापन.
३. पणन व प्रसिद्धीसाठी साहित्य तयार करणे.
४. संभाव्य गुंतवणूकदारांचा शोध घेणे.
५. गुंतवणूकदार सेवा व्यवस्थापन.
६. सामंजस्य करारांच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे.

मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. माध्यमांशी संपर्क, बातम्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे.
२. साहित्य, पुस्तिका, व्हिडीओ बनवणे व प्रसिद्ध करणे.
३. गुंतवणूकदारांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे.
४. जनसंपर्क विषयक कार्यक्रम आयोजित करणे.

मऔवी महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे
१. प्राधान्य भूखंड वाटप अर्जांच्या सविस्तर प्रकलप अहवालांची (डीपीआर) छाननी करून अभिप्राय देणे
२. उत्पादनात बदल करण्या विषयीच्या प्रस्तावांची छाननी करणे (लाल वर्ग)
३. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा घटकांस इरादापत्र / नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करणे
४. गुंतागुंतीच्या / विशिष्ट प्रकरणांतील उद्योगांच्या उत्पादनाची तारीख निश्चित करणे

मुख्य नगर रचना अधिकारी औद्योगिक ठिकाणाच्या विकासाचे नियोजन करून त्या औद्योगिक क्षेत्राचा योग्य आराखडा तयार केला जातो.
मऔवि महामंडळाच्या या विभागावर पुढील कार्यांची जबाबदारी आहे:
१. इमारतीचा आराखडा मंजूर करणे
२. भोगवटा प्रमाणपत्र (ओसी)
३. पूर्णत्वाचा दाखला (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्राची तपासणी
४. झाडे पाडणे, फांद्या छाटणे यांना परवानगी देणे

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन