पायाभूत सुविधा आणि संसाधने

प्लग अँड प्ले

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत औद्योगिक वापराकरीता बिल्ट-अप (तयार) शेड्स तर औद्योगिक व वाणिज्य वापराकरीता गाळे उपलब्ध करून देण्यात येते. आजपर्यंत ६७ औद्योगिक क्षेत्रांमध्ये ४०९५ बिल्ट-अप (तयार) शेड्स व ८२ औद्योगिक क्षेत्रात ३००३ गाळे उपलब्ध केले आहेत. त्याबाबतची अधिक माहितीसाठी (https://www.midcindia.org/land-bank) या लिंकवर क्लीक करा.

हे शेड्स आणि गाळे (http://ebid.midcindia.org/eproc/login.aspx) या ई निविदा प्रणालीमार्फत वाटप करण्यात आलेली आहे. तयार शेड्स आणि गाळे औद्योगिक वापराकरीता निर्धारित केलेल्या जमिनीच्या क्षेत्रीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्लग आणि प्ले उत्तम पर्याय आहे.
शेड्स हे मुख्यत: उत्पादन कार्यासाठी उपलब्ध असते. तर गाळे उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील संबंधितांसाठी (उदा. मायक्रो- इलेक्ट्रॉनिक्स्, टेक्सटाईल, आयटी युनिट्स इ.)

प्लग अँड प्ले ही सुविधा खालील पूर्वमान्यतेसाठी (आवश्यकतेनुसार) येते.

  • अकृषिक मान्यता
  • इमारत आराखडा मंजूरी
  • भोगवटा प्रमाणपत्रासाठी मंजूरी
  • नळ जोडणी

आवश्यकतेनुसार उर्वरित मंजुरी सिंगल विंडो सिस्टीमद्वारे देण्यात येते. एमआयडीसीने खालील ठिकाणी ग्रीनफील्ड औद्योगिक क्षेत्र (४४५० एकर) प्रस्तावित केले आहे. :

  • दिघी – मानगांव (रायगड)
  • खालापूर (रायगड)
  • तळोगाव (पुणे)
  • अतिरिक्त दिंडोरी (नाशिक)
  • अतिरिक्त बुटीबोरी (नागपूर)
  • सुपा (अहमदनगर)

वाटपासाठी “प्लग आणि प्ले मॉडेल” द्वारे एकूण ग्रीनफिल्ड क्षेत्रापैकी ७५% (म्हणजे ३३३७.५० एकर) जमीन सध्याच्या धोरणानुसार दीर्घ भाडेतत्त्वावर गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे आणि उर्वरित २५% (म्हणजे १११२.५० एकर) जमीन विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. –

  • लँड इनस्टॉलमेन्ट मॉडल : ५५६.२५ एकर
  • लँड रेंटल मॉडेल : ३०६.२५ एकर
  • लँड + शेड्स मॉडेल : २५० एकर

वीज (इलेक्ट्रीसीटी)

महामंडळांतर्गत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (एमएसइडीसीएल) यांचेमार्फत वीजेचा पुरवठा केला जातो. (https://www.mahadiscom.in/en/home/)

  • इंस्टॉल्ड कॅपेसीटी : ३८३५५.४८ Mw
  • टोटल जनरेशन : ८८.१४ bn Kwh
  • टोटल कन्झम्पशन : १००bn kwh

पाणी (वॉटर)

सर्वश्रेष्ठ पायाभूत सुविधा
  • पंपींग क्षमता = १००३६१ HP
  • पाण्याच्या पाईप लाईनचे जाळे : ४४१६ KM
ग्राहक (ग्राहक आधार)
  • औद्योगिक ग्राहक : ५१६३३
  • घरगूती ग्राहक : ५१७२
  • औद्योगिक ग्राहक वापर : ८८४.२० MLD
  • घरगूती ग्राहक वापर : ७०१.६४ MLD
मऔवि महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती
  • एकूण क्षमता = २४६१ MLD
  • सद्यस्थितीत वापर = १५८५.८४ MLD

कनेक्टीव्हीटी

मऔवि महामंडळामार्फत एकूण ३२५८ किमीचे रस्ते बांधणी

बुध्दीमत्ता आणि कौशल्य

महाराष्ट्रात २० राज्य विद्यापीठ आणि २१ अभिमत विद्यापीठे असलेले मुबलक कुशल मनुष्यबळ आहे. राज्यात दरवर्षी १.६ दशलक्ष विद्यार्थ्यांची नोंदणी असलेले ६,००० हून अधिक संस्था आहेत.

शाखा संस्था क्षमता
सामान्य शिक्षण (कला, विज्ञान, वाणिज्य, विधी) ३,२०९ ११.५६ लाख
अभियांत्रीकी १,०६४ ३.२१ लाख
वास्तूशास्त्र ९१ ५,३०७
एमबीए/एमएमस आणि पीजीडीएम ४१६ ४६,५६६
हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग १३ ६६८
फार्मसी ५२५ ३०,०७८
मास्टर इन कम्प्युटर ॲप्लीकेशन ११५ ९,६५०
औद्योगिक प्रशिक्षण संस्था ८४६ १.२७ लाख
वैद्यकीय शिक्षण ५१३ २६,९४६

नैसर्गिक गॅस

नैसर्गिक गॅस पाइपलाईन मऔवि महामंडळाच्या खालील क्षेत्रात उपलब्ध् आहेत.

  • अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र
  • अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र
  • बारामती औद्योगिक क्षेत्र
  • भोकरपाडा औद्योगिक क्षेत्र
  • चाकण टप्पा क्र. – १ औद्योगिक क्षेत्र
  • चाकण टप्पा क्र. – २ औद्योगिक क्षेत्र
  • चाकण टप्पा क्र. – ३ औद्योगिक क्षेत्र
  • चाकण टप्पा क्र. – ४ औद्योगिक क्षेत्र
  • कागल हातकणंगले (पंचतारांकीत) औद्योगिक क्षेत्र
  • कोल्हापूर (गोकूळ शिरगाव) औद्योगिक क्षेत्र

  • कोल्हापूर (शिरोळी) औद्योगिक क्षेत्र
  • लोटे परशूराम औद्योगिक क्षेत्र
  • पिंपिरी – चिंचवड औद्योगिक क्षेत्र
  • राजंणगाव (टप्पा – १) औद्योगिक क्षेत्र
  • रत्नागिरी (मिरजोळे ब्लॉक) औद्योगिक क्षेत्र
  • टी. टी. सी. औद्योगिक क्षेत्र
  • तळेगाव औद्योगिक क्षेत्र
  • तळोज औद्योगिक क्षेत्र
  • विळे भागड औद्योगिक क्षेत्र
  • चिंचोली औद्योगिक क्षेत्र

अग्निशमन सेवा

राज्याचे धोरण:

महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंध आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम, २००६ च्या कलम २१ नुसार, शहरी स्थानिक संस्था आणि विशेष नियोजन प्राधिकरण अर्थात महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायत आणि विशेष नियोजन प्राधिकरण आपापल्या क्षेत्रात आग आणि आपत्कालीन सेवेची जबाबदारी आहे.

मऔवि महामंडळाचे धोरण

मऔवि महामंडळाच्या संचालक मंडळाने आपल्या औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन सेवा पुरवण्यासाठी पुढील धोरणात्मक निर्णय घेतला आहे. “औद्योगिक क्षेत्रात असलेल्या घातक रसायनांची प्रक्रिया, ज्वलनशील, अत्यंत ज्वलनशील साहित्य, वस्त्रोद्योग पार्क, आयटी पार्क आणि थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) अशा प्रमुख क्षेत्रात मऔवि महामंडळाच्या अग्निशमन केंद्राद्वारे व्यवस्थापन केले जाते ”. मऔवि महामंडळाच्या संचालक मंडळ आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार, मऔवि महामंडळाने अग्निशमन सेवांचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी विविध पदे तयार केली आहेत.

फायर स्टेशनच्या संपर्क तपशीलांसाठी, येथे क्लिक करा

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन