अभियांत्रिकी विभाग

नगर नियोजन विभाग

ऑपरेशनपूर्वी

अभियांत्रिकी विभाग

नव्याने नळ जोडणी (तात्पुरते)

भूखंड वाटपानंतर इमारतीच्या बांधकामासाठी ही सेवा आवश्यक आहे.

नवीन सांडपाणी (ड्रेनेज) कनेक्शन (आवश्यक असल्यास)

आपल्या भूखंडतील सांडपाण्याचा प्रवाह महामंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत जोडण्यासाठी ही सेवा आवश्यक आहे.

पाण्याची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

कोणत्याही सेवा लागू होण्यासाठी कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ते फक्त कार्यालयीन वापरासाठी आहे. ते पाणी देयक जारी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यामार्फत दिले जाते. हे प्रमाणित करते की भूखंड धारकाकडे थकित पाणी, अग्निशमन आणि सेवा शुल्काची थकबाकी नाही. (या प्रमाणपत्राचा वापर महामंडळाबाहेर करू नये).
एसडब्ल्यूसीकडे अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. एसडब्ल्यूसीकडे अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

कोणतेही शुल्क लागू नाही.
हे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र पुढील महिन्याचे पाण्याचे देयक जारी होईपर्यंत वैध असेल.

विजेच्या जोडणीसाठी ना - हरकत प्रमाणपत्र

औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाकरीता किलोवॅट (Kwh) च्या वीज जोडणी मंजूरीकरीता ही सेवा आवश्यक आहे. .

पाण्याचे देयक ग्राहक पोर्टल

पाणी देयके , सर्व्हिस देयके आणि ग्रामपंचायत कर पावती ग्राहक सेवा संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. कृपया ग्राहक सेवा संकेतस्थळांवर रजिस्टर करा आणि या सेवांचा लाभ घ्या. देयके व पावती सोबतच मागील १२ महिन्यांची माहितीही उपलब्ध आहे आणि सोबत बरेच काही

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन