अभियांत्रिकी विभाग

नगर नियोजन विभाग

ऑपरेशनपूर्वी

नगर नियोजन

मान्यताप्राप्त वास्तुविशारद

आपण आपल्या प्रकल्पासाठी नामिकाधारक वास्तुशास्त्रज्ञ व वास्तूशास्त्रज्ञांची यादी व क्रमवारी पाहुन योग्य वास्तुशास्त्रज्ञाची निवड करु शकता.

झाडे पडणे / छाटणी (ट्रिमिंग) / पुन्हा लागवड करण्यास परवानगी

ही सेवा झाडे पाडणे/ छाटणी/ पुर्नरोपण प्रक्रिया अंमलबजावणी दर्शवते. ही परवानगी विभागाच्या संबंधित विशेष नियोजन प्राधिकरणाव्दारे करण्यात येते. हे प्रमाणपत्र एसडब्ल्यूसीवर अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत देण्यात येते.

इमारत आराखडा आणि तात्पुरते अग्निशमन

इमारत बांधकामाची सुरूवात करण्यापूर्वी ही सेवा आवश्यक आहे. ही सेवा अर्जदार व मऔविम प्रचलन प्राधिकरण या दोघांसाठी आहे. आणि ही सेवा संबंधित विशेष नियोजन प्राधिकरण व नियोजन व अग्निशमन विभागातील अग्निशमन अधिकारी यांचे मार्फत दिली जाते. काम सुरु करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर भूखंडधारक बांधकाम सुरु करु शकतो असे यात प्रमाणित केलेले असते. अर्ज दाखल केल्यापासून 15 दिवसांच्या आत इमारत आराखडा मंजुरी व अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र(एनओसी) मिळते.
विकास शुल्क, छाननी शुल्क, श्रम उपकर इत्यादि विविध शुल्क लागू आहेत. हे प्रमाणपत्र प्रारंभ प्रमाणपत्र निर्गमित केल्याच्या दिनांकापासून एक वर्षासाठी वैध असते.

भोगवटा प्रमाणपत्र

हे भोगवटा प्रमाणपत्र मऔविममार्फत देण्यात येते ज्यामध्ये संबंधित विशेष नियोजन प्राधिकरणाने (एसपीए) मंजूर केलेल्या आराखडयानुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्याचे घोषित होते. बांधलेली इमारत ताबा घेण्यास तयार असताना हे दिले जाते. हे प्रमाणपत्र एसडब्ल्यूसी वर अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 8 दिवसांच्या आत दिले जाते.

सुधारित इमारत आराखडयास मान्यता

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन